आपण एखादी मालमत्ता खरेदी करत असतो तेव्हा त्या मालमत्तेवर आपला मालकी हक्क प्राप्त करण्यासाठी आपण एक ठरलेली विशिष्ट रक्कम भरत असतो.
याचसोबत तो प्राप्त केलेला मालकी हक्क टिकवुन ठेवण्यासाठी आपणास नगरपालिकेत,सरकारी खात्यात देखील मालमत्ता कर(property tax) म्हणुन एक विशिष्ट रक्कम द्यावी लागत असते.
मालमत्तेचे जसे स्वरूप असेल तसा आपणास त्याचा कर कालावधी लागु केला जात असतो हा कर कालावधी वार्षिक तसेच मासिक असा असतो.
आणि आपल्याकडुन जो मालमत्ता कर वसुल केला जातो त्या कराची सर्व रक्कम नगरपालिका तसेच सरकारी खाते त्या क्षेत्रातील विकास कार्यासाठी वापरत असते.
आजच्या लेखात आपण ह्याच मालमत्ता करा(property tax)विषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
अशी स्पर्श करता येण्यासारखी(tangible)कुठलीही विशिष्ट संपत्ती तसेच मालमत्ता(property) जी आपल्या नावावर असते.अशा संपत्तीवर जो कर आपण भरत असतो त्यालाच मालमत्ता कर(property tax) असे म्हटले
आपण एखादे घर प्लाँट किंवा आँफिस,दुकान इत्यादी विकत घेत असतो,तसेच आपल्या नावावर करत असतो तेव्हा आपणास त्याच्या अलग अलग प्रकारच्या स्टँम्प रेजिस्टेशन फी भराव्या लागत असतात.
आणि एकदा मालमत्ता आपल्या नावावर झाल्यावर आपणास आपण राहतो आहे त्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमाचे पालन करत आपण राहतो त्या स्थळानुसार मासिक तसेच वार्षिक कर भरावा लागत असतो.हा कर मालमत्तेनुसार तीन महीने,सहा महिने किंवा वार्षिक देखील असु शकतो.
ग्रामीण भागात तेथील असे कर घरमालकाला प्राँपर्टी टँक्स म्हणुन भरावे लागत असतात.पण ग्रामीण भागात शहराप्रमाणे याला प्राँपर्टी टँक्स असे न म्हणता घरफाळा असे म्हटले जात असते.
आपल्यातील खुप जणांना हा प्रश्न पडत असतो की आपणास प्राँपर्टी टँक्स भरणे का गरजेचे असते तसेच तो का भरावा लागतो त्याचे कारण काय असते?
See also इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास: Israel Palestine Conflictतर स्थानिक नगरपालिका संस्थेकडुन आपणास काही महत्वाच्या सेवा सुविधा पुरविल्या जात असतात जसे की आपल्या आजुबाजुच्या परिसरातील कचरा साफ करून परिसर स्वच्छ ठेवणे,आपणास पाण्याचा पुरवठा करणे,ड्रेनेज सुविधा पुरविणे,रस्त्याची दुरूस्ती करने इत्यादी सुविधा आपणास पुरवण्यासाठी महानगरपालिकेस महसुलाची गरज असते.
आणि हा महसुल प्राँपर्टी टँक्स मधुन स्थानिक नगरपालिका संस्थेस म्हणजेच नगरपालिकेस प्राप्त होत असतो.
म्हणजेच आपण जो प्राँपर्टी टँक्स भरतो त्या टँक्समधील रक्कमेतुनच आपणास स्थानिक नगरपालिका विविध सुविधा पुरवण्याचे काम करत असते.
याचाच अर्थ आपण भरतो तो प्राँपर्टी टँक्स हाच महानगरपालिका संस्थेचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे आपण भरलेला टँक्स हाच ते आपल्याला विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी वापरत असतात.
खुप जण असे देखील नेहमी विचारत असतात की प्राँपर्टी टँक्स जर भरलाच नाही तर काय होईल?
आपल्यावर काही कारवाई केली जाऊ शकते?
होय , जर आपल्यापैकी एखाद्याने प्राँपर्टी टँक्स भरण्यास नकार दिला किंवा प्राँपर्टी टँक्स भरलाच नाही.तर नगरपालिका संस्थेकडून आपल्याला जो नागरी सेवांचा पुरवठा केला जात असतो जसे की पाणी कनेक्शन तसेच इतर सोयी सुविधा त्या खंडित केल्या जाऊ शकतात.
याचसोबत देय रक्कम प्राप्त करण्यासाठी आपल्यावर कायदेशीर पदधतीने कारवाई केली जाऊ शकते.म्हणुन आपण आपल्याला शक्य होईल तितक्या लवकर प्राँपर्टी टँक्स वेळेतच भरून द्यायला हवा.
वरील परिच्छेदात आपण प्राँपर्टी टँक्स भरणे का गरजेचे आहे आणि तो भरला नाहीतर आपल्यावर काय कारवाई होऊ शकते हे जाणुन घेतले.
पण मालमत्ता कराचे एवढेच महत्व नसते या पलीकडे देखील मालमत्ता कराचे भरपुर महत्व असते आणि याचे अनेक फायदे सुदधा असतात जे आपणास माहीत नसतात चला तर मग हे महत्व आणि फायदे काय आहेत हे देखील जाणुन घेऊया.
● जर भविष्यात कधीही मालमत्तेसंबंधित(property related) काही वादविवाद घडुन आले कोणी आपल्या प्राँपर्टीवर मालकी हक्क दाखवायचा प्रयत्न केला तर आपण प्राँपर्टी वरचा आपला मालकी हक्क दाखवण्यासाठी तसेच तो इतरांसमोर सिदध करायला आपण भरलेल्या मालमत्तेच्या कराची पावती(property tax receipt) उपयोगी पडत असते.
आपण ती पावती इतरांना दाखवू शकतो.कारण कुठल्याही मालमत्तेचा कर त्या मालमत्तेचा मालकच भरत असतो.आणि आपल्याकडे ही पावती असेल तर हे सिदध होऊन जाते की आपण त्या प्राँपर्टीचे खरे मालक आहात.
See also जगातील 15 बेस्ट पर्सनल फायनान्स पुस्तके - आर्थिक सक्षमता - Top 10 Best Personal Finance Book
● याचसोबत स्थानिक नगरपालिकेकडुन करण्यात येत असलेल्या नोंदणीत आपल्या नावावर कुठलीही प्राँपर्टी नोंदणीकृत करण्यासाठी तिच्यावरील आपल्या मालकी हक्काचे प्रमाणीकरण देण्यासाठी आपणास प्राँपर्टी संबंधित काही महत्वाचे डाँक्युमेंट देखील सबमीट करावे लागत असतात.
ज्यात मालमत्तेची विक्री प्रत,सोसायटी कडुन प्राप्त झालेली मंजुरी,चुकामुक न करता व्यवस्थितरीत्या भरलेला अर्ज,आपला म्हणजे प्राँपर्टी मालकाचा फोटो,आपला अँड्रेस प्रूफ आणि मालमत्तेच्या नवीन मालकाने म्हणजेच आपण मागील वेळेस भरलेल्या प्राँपर्टी टँक्सची पावती
● याचसोबत जर मालमत्तेच्या मालकास आपल्या मालमत्तेवर एखादे कर्ज काढायचे असेल तर अशा वेळी देखील त्याला त्या प्राँपर्टीचा टँक्स भरत असल्याची पावती दाखवायसाठी लागत असते.
अशा पदधतीने प्राँपर्टी टँक्स भरण्याचे,प्राँपर्टी टँक्स नोंदी अप टु डेट करण्याचे आपणास अनेक फायदे होत असतात.
कर गणना करताना पुढील बाबींचा विशेषकरून विचार केला जात असतो-
● प्राँपर्टीचा म्हणजेच मालमत्तेचा प्रकार कुठला आहे.
● प्राँपर्टीची जागा म्हणजेच property location काय आहे?
● वहिवाटीची स्थिती काय आहे?
● बांधण्यात आलेल्या एकूण मजल्यांची संख्या किती आहे?
● मग यानंतर आपण आपल्या महानगरपालिकेची निवड करून घ्यावी.
● सर्व नियम आणि अटी वाचुन घ्यावेत.आणि वर दिलेल्या अटी नियम आपल्याला मान्य आहे ह्यावर टिक करावे.
● मग property tax filing ह्या बटणावर क्लीक करावे.
● मग आपला property id enter करून submit बटणावर क्लीक करावे.
● यानंतर आपण आपली contact details,property type,flower number इत्यादी सर्व महत्वाची माहीती व्यवस्थित भरली आहे का नाही हे एकदा नीट चेक करून घ्यावे.
● यानंतर paying mode select करून घ्यावा.
उदा, debit card,credit card,internet banking इत्यादी.
● कुठलेही एक पेमेंट मोड सिलेक्ट करून झाल्यानंतर submit वर ओके करावे आणि पेमेंट जमा करावे.
● त्यानंतर आपल्याला प्राँपर्टी टँक्स भरल्याची एक पावती मिळल तिची प्रिंट काढुन घ्यावी.
● आणि मग शेवटी सर्व payment process done झाल्यानंतर generate झालेले चलन save करून घ्यावे.
मालमत्ता कराची गणना कशा पदधतीने केली जात असते?(how to calculate property tax in Marathi)
भारत देशात मालमत्ता कर हा प्रत्येक राज्यात वेगवेगळया प्रकारे तसेच पदधतीने आकारला जात असतो.
1)युनिट क्षेत्र मूल्य प्रणाली (unit area value system) :
See also अग्नी ५ मिसाईलची वैशिष्टये - Agni 5 missile information in Marathiयुनिट क्षेत्र मुल्य प्रणाली ही कर मोजण्याची पदधत बँगलोर,कोलकत्ता,दिल्ली इत्यादी ठिकाणच्या नगरपालिकांकडुन वापरली जात असते.
2)भांडवल मुख्य प्रणाली (Capital main system :
कर प्रणालीच्या ह्या प्रकारामध्ये प्राँपर्टीच्या मार्केट मधील किंमतीच्या टक्केवारीनुसार कर लावण्यात येतो.
कराची गणना करण्याकरीता वित्तीय भांडवल क्षेत्रातील महापालिका अधिकारी
हे सूत्र वापरतात.
3) वार्षिक भाडे मुल्य प्रणाली (Annual rental pricing system)
वार्षिक भाडे मुल्य प्रणालीचा वापर करून कर मोजायला प्राँपर्टीचे Annual rental pricing चा विचार केला जात असतो.यात प्राँपर्टीचे रेंट प्राईज प्राँपर्टीवर जमा करण्यात आलेल्या रेंटच्या आधारे मोजण्यात येत नसते.परंतु ही एक किंमत असते जी महानगरपालिकेकडुन प्राँपर्टीच्या अवतीभोवतीचा आकार,स्थळ,चिन्ह यावर ठरवण्यात येते.
ही कर मोजणी पदधत चेन्नई आणि हैदराबाद येथे विशेषकरून वापरली जाते.
1)मालमत्तेचा कर भरण्यासाठी कोण जबाबदार ठरत असते?
कुठल्याही मालमत्तेचा कर(property tax) भरण्यासाठी फक्त ती मालमत्ता ज्याच्या नावावर आहे तो त्या मालमत्तेचा मालकच जबाबदार ठरत असतो.
जर आपण एखाद्या बंगल्यात,घरात भाडेकरू म्हणुन राहत असू तर आपणास प्राँपर्टी टँक्स देण्याबाबत कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नसते.कारण ती जबाबदारी प्राँपर्टी मालकाची असते.
2)कुठलीही नवीन प्राँपर्टी खरेदी केल्यानंतर आपण त्या प्राँपर्टीचे टायटल महानगरपालिकेच्या नोंदीत अदद्यावत(up to date) का करून घ्यायला हवे?
जेव्हा आपण एखादी नवीन प्राँपर्टी खरेदी करत असतो तेव्हा जोपर्यत आपण त्या प्राँपर्टी खरेदीची थकबाकी रक्कम जमा करत नाही तोपर्यत त्या प्राँपर्टीचा संपूर्ण मालकी हक्क आपल्या नावावर केला जात नसतो.
आणि त्यातच जर आपण एखादी प्राँपर्टी खरेदी केल्यानंतर महानगरपालिकेत जाऊन तेथील नोंदीत प्राँपर्टीच्या नवीनमालकाचे(म्हणजेच आपले नाव) जर आपण अद्यावत(up to date) केले नाही तर महानगरपालिकेने नोंदणी केल्या असलेल्या वहीत आपले नाव न दिसता त्या प्राँपर्टीच्या आधीच्या मालकाचे नाव दिसुन येत असते
3)कोणकोणत्या मालमत्तेवर प्राँपर्टी टँक्स आकारला जात नसतो?
पुढील काही मालमत्ता आहेत ज्यावर मालमत्ता कर(property tax) आकारला जात नसतो.
● विविध प्रकारची धार्मिक प्रार्थनास्थळ
4) जर एखाद्या व्यक्तीने प्राँपर्टी टँक्स वेळेवर नही भरला तर त्याला काय दंड आकारला जातो?त्याच्यावर एकंदरीत काय कारवाई होते?
प्राँपर्टी टँक्स भरायला उशीर केल्यास देशातील सर्व अधिकारी वर्गाकडुन दंड आकारणी केली जात असते. महिन्याचा दंड आपण कोणत्या शहरात राहतो आहे त्यावरून ठरत असतो.
यात आपण भरलेल्या थकबाकी रक्कमेमधुन एक ते दोन टक्के इतका दंड आकारला जात असतो.जर प्राँपर्टी टँक्स भरायला खुपच उशीर केला तर आपली प्राँपर्टी जप्त केली जाऊ शकते तसेच नुकसानभरपाई वसुल करण्यासाठी ती विकण्याचा देखील अधिकार अधिकारी वर्गाकडे असतो.
प्राँपर्टी टँक्समध्ये टँक्स सवलत मिळत असलेल्या प्राँपर्टीत पुढील काही बाबींचा समावेश होत असतो.
● शैक्षणिक संस्थाना देखील प्राँपर्टी टँक्समध्ये कर सवलत मिळत असते.
● शेती विषयक प्राँपर्टी मध्ये देखील कर सवलतीची सुविधा प्राप्त होत असते.
● प्राँपर्टी टँक्समध्ये ज्येष्ठ नागरीकांना कर सवलतीचा लाभ प्राप्त होत असतो.
● असे व्यक्ती जे अपंग आहे त्यांना देखील यात कर सवलत प्राप्त होत असते.
● डिफेन्स सर्विसमधून सेवानिवृत्त(retired) झालेले कर्मचारी.
● भारतीय सैन्य दलातील म्हणजेच BSF, CRPF,fired brigadeमध्ये काम करत असताना देशाची सेवा करत असलेल्या शहीद जवानांच्या परिवाराला देखील प्राँपर्टी टँक्स बेनिफिट दिला जात असतो.
6)कुठल्याही मालमत्तेची गणना(property calculation) कशी केली जाते?(How is any property calculation done?)
कुठल्याही मालमत्तेची गणना म्हणजेच property calculation हे महानगरपालिका संस्थेकडुन करण्यात आलेल्या मुल्यांकनानुसार (evaluation) केली जात असते.